Home महाराष्ट्र कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच शिवभोजन योजना देखील फसवीच : राम कदम...

कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच शिवभोजन योजना देखील फसवीच : राम कदम यांचा आरोप

0

महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर दिली मात्र त्यात अनेक नियम व अटी ठेवल्या आहेत. शासनाच्या घोषनेनुसार २ लाखांपर्यंत कर्ज असल्यास कर्जमाफी केली जाणार आहे. परंतु २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अर्थात कर्जमाफीच मिळणार नाही. याउलट राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवभोजनाच्या रुपात १० रुपयांत सर्वसामान्यांना जेवण मिळेल अशी घोषणा शासनाने केली आहे. मात्र यातही काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी “सरकारच्या या दोन्ही योजना फसव्या असल्याचा” आरोप राम कदम यांनी केला आहे. या बाबत त्यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून एक पोस्ट शेअर केली. यात ते काय म्हणाले पहा सविस्तर…

राम कदम म्हणाले…

“बिनशर्त, सरसकट अशा शब्दांचे आश्वासन द्यायचे आणि करायचे उलट. ठाकरे सरकारचा हाच खरा चेहरा आहे. यांची कर्जमाफी जितकी फसवी आहे तितकीच त्यांची शिवभोजन योजना. भुकेल्याला अन्न देतांना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. ती चेष्टा तात्काळ थांबली पाहिजे.”

यावर आता शासनाची काय प्रतिक्रिया असेल हे आता वेळच सांगेल.