अजित पवारांनी अचानक भाजप सोबत हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व पुढील दोन दिवसात राजीनामा देखील दिला. परिणामी बहुमत सिद्ध न करता आल्याने भाजप तोंडघशी पडलं आहे. दीड-दोन दिवसांचा मुख्यमंत्री होऊन अजित पवारांच्या पाठोपाठ फडणवीसांनी देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. परिणामी या सर्व नाट्यामागे शरद पवारांचा हात असल्याचे सांगितले जात होते. यावर नुकताच संजय राऊत यांनी एक मोठा गौप्य स्फोट केला आहे.
संजय राऊत यावेळी म्हणाले की, “हे सगळं आधीच ठरलं होतं, आणि अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या सुद्धा. या सर्व नाट्याचा लेखक कोण होतं हे तुम्हाला काही दिवसात कळेलच. राऊत यांनी त्यांच्या जुन्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, “मी आधीच सांगितलं होतं की शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला १०० जन्म घ्यावे लागतील.” संजय राऊत यांच्या या संकेतांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, खरंच या सर्व नाट्यमागे शरद पवार होते का? भाजपला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हा खेळ रचला होता का? अशी सर्वत्र चर्च होत आहे.