नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये ४५ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यात टेक्निशियन, टेक्निकल ऑफिसर, फायर सेफ्टी ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार १० वी पास पासून ते पदवीप्राप्त उमेदवारांना येथे अर्ज करण्याची संधी आहे. काही पदांसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार असून वरिष्ठ पदांसाठी थेट मुलाखतीतून निवड होणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती ncl-india.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या ४५ पदांमध्ये २० पदे टेक्निशियन, १० टेक्निकल असिस्टंट, १२ टेक्निकल ऑफिसर, २ सिनियर टेक्निकल ऑफिसर व १ फायर सेफ्टी ऑफिसर या सर्व पदांचा समावेश आहे. यातील टेक्निशियन पदांसाठी १० वी पास उमेदवारांना संधी आहे तर अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार संबंधित फिल्डमध्ये BE अथवा B.tech पदवीधारक व काही कालावधीचा अनुभवप्राप्त असणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी २ डिसेंबरपर्यंत वरील संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी EWS/UR/OBC प्रवर्गांतील उमेदवारांना १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून आरक्षित प्रवर्गाला कुठलेही शुल्क भरावे लागणार नाही.