सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे मराठा विद्यार्थ्यांना यावर्षी कुठल्याही भरतीत आरक्षण मिळणार नाही. या कारणास्तव अनेक संघटनांनी तसेच राजकीय नेत्यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्याची विनंती केली. मात्र यावर अजूनही एकमत झाले नाहीये. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी कठोर भूमिका घेतली असून कुठ्लऊही परिस्थितीत भरती प्रक्रियेत मराठी विद्यार्थी डावलले जाणार नाहीत व वेळ पडल्यास उत्तराला उत्तर देऊ असे वक्तव्य केले.
काँग्रेस नेते व राज्यमंत्री विजय वड्डेट्टीवर यांनी मराठा समाजाच्या जागा वगळून इतरांची भरती प्रक्रिया सुरु ठेवावी असे मागणी केली होती. यावर नवी मुंबईतील प्रसार माध्यमांशी बोलतांना आबासाहेब पाटील यांनी विजय वड्डेट्टीवारांना उत्तर दिले. मराठा विद्यार्थ्यांना डावलले तर नोकरी भारतीय होऊ देणार नाही असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला.