दिवसांमागून दिवस जात आहेत मात्र राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापण करणार हे अद्याप ठरलेले नाही. जनता मात्र निर्णयाकडे कान लावून आतुरतेने वाट पाहत आहे. महायुतीच्या निवडणुकांमध्ये बाजी मारली खरी मात्र आता मुख्यमंत्री नक्की होणार कोण याची रस्सीखेच मागील अनेक दिवसांपासून चालू आहे. परिणामी सत्ता स्थापनेचा प्रश्न राहिला बाजूला आणि शिवसेना भाजप यांच्यातील तनावच वेगळं वळण घेत आहे. अशात आतापर्यंत अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी महायुतीवर टोलेबाजी केली. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लांबलचक फेसबुक पोस्ट लिहून एक आगळा वेगळा पण सणसणीत टोला दिला आहे. यात ते म्हणाले, “लग्न ठरवण्याच्या बैठकीतच एवढी भांडणं होत आहेत तर मग संसार नीट कसा होईल.” त्याचबरोबर “सरकार स्थापनेला होत असलेल्या उशिरामुळे एक नागरिक म्हणून मी चिंतेत आहे” असंही ते या पोस्ट मध्ये म्हणाले. सोशल मीडियावर रोहित पवारांची ही पोस्ट वणव्या प्रमाणे पसरत आहे.
पहा रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट समोरील लिंक वर….
https://m.facebook.com/story.php?story_fbid=769825853481159&id=220852055045211
रोहित पवार काय म्हणाले वाचा सविस्तर…
“महाराष्ट्राला असे अनेक नेते लाभले आहेत ज्यांच्याबद्दल संपूर्ण राज्याला नेहमीच आदर राहिला आहे, आदरणीय स्व. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल आदर असण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन. निवडणूकीपूर्वी युती करतांना सत्तेतला वाटा समान असेल असा शब्द शिवसेनेला देऊन देखील सध्या भाजप ज्याप्रकारे आपला शब्द फिरवत आहे हे बघता प्रश्न पडतो की आज जर स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असतं का?
राज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशीर मला चिंताग्रस्त करत आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या तडाख्यातून सावरायच्या आधीच त्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला अनेक समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर सरकार स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने आमच्या आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला, आम्ही त्याचा स्वीकार करून कामाला देखील लागलो आहोत मात्र भाजप-शिवसेना युतीमध्ये सध्या सुरू असणारा वाद हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे.
या वादाची दुसरी बाजू म्हणजे सरकार स्थापन करताना या दोन पक्षात असलेले मतभेद बघता पुढच्या पाच वर्षात खरंच भाजप-शिवसेना राज्याला एक स्थिर सरकार देऊ शकतील का? यापुर्वी देखील एकत्र सत्तेत असताना युतीमध्ये होणारा वाद सगळ्या राज्याने बघितला आहे. आतादेखील संख्याबळाच्या जोरावर भाजप ज्याप्रकारे शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न करत आहे, त्यातून नवीन वाद उद्भवून पुन्हा एकदा राज्यातील जनतेच्या नशिबात सत्ताधारी पक्षांची भांडणेच बघायची आहेत अस दिसतंय. कारण लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडण झाली तर पुढं जाऊन संसार कसा नीट होणार?
Maharashtra is blessed with many leaders who have earned the respect of the people. One such leader was honourable Balasaheb Thackeray. There are many reasons why I respect him. One major reason is his stature in national politics. Before elections, BJP promised to share equal power with Shiv Sena. But now BJP is going against its word. This brings us to the question that had Balasaheb Thackeray been alive today would BJP still be so brave?
I, as a citizen, am worried about the delay in forming the new government. Already hit by drought, now farmers are facing the lashing of rain. Rural as well as urban people are facing many problems. There is a need to support common man by forming the government at its earliest. The people have chosen us as the opposition. We have accepted the mandate and started working. But the recent skirmishes between BJP and Shiv Sena are an insult to democracy.
It poses another question which is whether Shivsena-BJP alliance will really give a firm government for next 5 years considering their current differences? The people have already witnessed their conflicts while they were ruling the state. With numbers on their side, BJP is trying to create hurdles for shiv sena and the people have to witness their conflict again. The question remains if there are so many conflicts while deciding the marriage, how will their future be a happy alliance?