Home महाराष्ट्र निवडणुकीपुर्वीच मिळतंय १० रुपयांत जेवन: जाणून घ्या कुठे

निवडणुकीपुर्वीच मिळतंय १० रुपयांत जेवन: जाणून घ्या कुठे

0

तुम्हाला ठाऊकच असेल की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात दहा रुपयांत पोटभर जेवण देण्याची घोषणा केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या वचननाम्यात तसे त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे. मात्र या योजनेचं खरंखुरं मॉडेल अंबरनाथमध्ये सहा महिन्यांपासून सुरू आहे. म्हणून असे करणारे शिवसेना पक्षप्रमुख पहिले व्यक्ती नसतील. जरी या संकल्पनेला जोरदार प्रतिसाद मिळत असला तर केवळ १० रुपयांत जेवण मिळणार म्हणून लोक शिवसेनेला वोट देणार का हा प्रश्न आहे, कारण आताही १० रुपयांत जेवण मिळतंच.

मीडिया न्यूज नुसार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर या तिघांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये १ मे रोजी दहा रुपयांत जेवण ही संकल्पना सुरू करण्यात आली. या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी आणि एक गोड पदार्थ असं जेवण दहा रुपयांत दिलं जात आहे. आता शिवसेनेचं हे शास्त्र कितपत जनतेवर प्रभावी पडेल हे पुढे कळेलच.