काही दिवसांपूर्वी कोरोनाचे चित्र थोडे धूसर होत असतांना आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत असलेली दिसून येत आहे. परिणामी सरकारने पुन्हा निर्बंध लागू करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने काही सक्तीचे नियम बनवले आहेत.
दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असल्याने राज्य सरकारने या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व लोकांना आधी आरटीपीसी अर्थात कोरोना चाचणी करणे सक्तीचे केले आहे. याबाबत राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार ही चाचणी प्रवासाच्या ९६ तास आधी केलेली असणे आवश्यक आहे. या चाचणीत ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल त्यांनाच महाराष्ट्रात येण्यास परवानगी मिळणार आहे. तसेच ही चाचणी स्वखर्चाने करावी लागणार आहे.