Home महाराष्ट्र “फडणवीस तुम्ही रोज राज्यभर फिरत फक्त सरकार विरोधी भाषणे ठोकता, श्रेय फक्त...

“फडणवीस तुम्ही रोज राज्यभर फिरत फक्त सरकार विरोधी भाषणे ठोकता, श्रेय फक्त संघाला देता!”- सामना अग्रलेख

0

माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे सद्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून प्रत्येक ठिकाणी दौरा करून राज्य सरकार हे कोरोनावर कसे अपयशी ठरत आहे यावर नवीन नवीन वक्तव्य करत आहेत. सामनाच्या अग्रलेखातून आज फडणवीसांचा खरपूस समाचार घेण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने धारावी मधील प्रशासनाच्या यशाचे कौतुक केले यानंतर हे कौतुक कसे चुकीचे आहे आणि धारावी मध्ये फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा काम करतो असा सगळीकडे भाजप मार्फत प्रचार सुरू आहे, या वक्तव्यावरून सामना मधून सांगण्यात आले की , ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धारावीमधील कार्य कौतुकास्पद आहे पण याचा अर्थ हा होत नाही की महापालिका आणि प्रशासन काहीच करत नाही. महापालिका आणि महापालिकेचे पांढऱ्या कपड्यातील देवदूत यांचे कार्य महान असून फक्त संघाला श्रेय देणे हे अन्याय आहे”

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर टीका करताना सामना मधून विचारण्यात आले की , ” फडणवीस साहेब तुम्ही राज्यभर दौरे करून कोरोनाचा मुकबल्यासाठी राज्य सरकार कसे अपयशी आहे याची प्रवचने झोडत आहात…….प्रवचने नकोत आता कोरोना मधून मार्ग कसा काढायचा ते सांगा”

दरम्यान “एक शरद, बाकी सगळे गारद” या मुलाखती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सुद्धा ‘फडणवीस यांना २०१४ मध्ये मुख्यमंत्री होण्या अगोदर राज्यात कोणीच ओळखत नव्हते’ असा टोला लगावला आहे तर आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांच्या दौऱ्या ला ” Disaster Tourism” असे संबोधले आहे.