Home महाराष्ट्र दुःखद वार्ता: हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू!

दुःखद वार्ता: हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू!

0

मागील काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडलेल्या एका घटनेने सबंध भारतीयांचं हृदय पिळवटणारी घटना घडली. भर रस्त्यात एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याचा दोन नराधमांनी प्रयत्न केला. त्या गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होत्या. मात्र त्या अपयशी ठरल्या व अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.

मीडिया रिपोर्टनुसार आज पहाटे ६ वाजून ५५ मिनिटांनी प्राध्यापक तरुणीची प्राणज्योत मावळली. घटना घडली तेव्हाच तरुणाची श्वसन नलिका डॅमेज झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. हिंगणघाटच्या डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी दोनच्या सुमारास पीडित तरुणीला हृद्यविकाराचा झटका आला होता, आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.