Home महाराष्ट्र साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, म्हणून १०० कोटींचा निधी द्या; साईबाबांच्या जन्मस्थळ वादाला...

साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, म्हणून १०० कोटींचा निधी द्या; साईबाबांच्या जन्मस्थळ वादाला नवं वळण

0

शिर्डी व पाथरी येथील नागरिकांमध्ये सध्या साईबाबांच्या जन्मावरून जोरदार वाद चालू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी, जि. परभणीचा उल्लेख साई जन्मस्थळ असा केल्याने शिर्डीत संताप व्यक्त झाला. याबाबत पाथरीकारांनी ‘२९’ पुरावे असल्याचे सांगत साईबाबा यांचा जन्म पाथरीचाच असल्याचा दावा केला. मात्र आता या वादात बीडच्या नागरिकांनीही उडी घेत साई बाबांची कर्मभूमी बीड आहे असं सांगत १०० कोटींच्या निधीची मागणी केली आहे.

बीडकरांच्या मते ‘साईबाबा पाथरी वरून शिर्डीला जात असतांना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. दरम्यान या ठिकाणी बाबांनी नोकरी देखील केली होती आणि म्हणूनच साईंची कर्मभूमी असल्याने याकरिता बीडचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करावा व आम्हालाही १०० कोटी निधी देण्यात यावा’ अशी मागणी बीडमधील साई भक्तांनी केली आहे. आता यावर सरकारचं काय धोरण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.