Home महाराष्ट्र “तुमच्या पुढे घालतो लोटांगण, आता काही वेळ बंद करा राजभवनाचे पटांगण”, संजय...

“तुमच्या पुढे घालतो लोटांगण, आता काही वेळ बंद करा राजभवनाचे पटांगण”, संजय राऊत आणि राज्यपाल सोशल मीडिया वर तुफान ट्रोल

0

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विट करत आज राजभवनात जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याबद्दल माहिती दिली. जवळपास २० मिनिटं या दोघांमध्ये विविधरंगी चर्चा झाली. पण ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांच म्हणणं आहे.

संजय राऊत यांनी ह्या भेटीनंतर एक फोटो ट्विटर वर प्रसारित केला यामध्ये संजय राऊत हे स्वतः राज्यपालांच्या लांबून पाया पडताना दिसत आहेत. या फोटो नंतर मात्र नितीन राऊत यांना नेटिझन्स नि अक्षरशः वेड लावण्याची वेळ आणली. या फोटोवरून नाना प्रकारे ट्रोल करत सोशल मीडिया वर ह्या दोहोंच्या भेटीबाबत खिल्ली उडवली जात आहे.

मागे काही दिवसांपूर्वि संजय राऊत यांनी राज्यपालांचे घर हे फालतू राजकारणाचा अड्डा बनत चालले असल्याची खोचक टीका केली होती. भाजप नेत्यांच्या मुख्यमंत्री सोडून राज्यपालांच्या वरचेवर भेटीगाठी यावर निशाणा साधत राऊत यांनी ही टीकेची झोड उठवली होती.

राज्यातील परिस्तिथीवरून विरोधी पक्ष सद्या आक्रमक झाला असून त्यांनी राज्यपालांना भेटत काल महाराष्ट्र बचाओ आंदोलन सुरू केले यावर प्रतिक्रिया म्हणून राऊत यांची ही भेट समजली जाते. या घटनेने मात्र सरकार समर्थक आणि विरोधक दोहोंनि सोशल मीडिया वर मिम्स आणि ट्रोल ची सरबत्ती उडवली आहे हे नक्की!