Home महाराष्ट्र राज्यातील शाळा ०३ ऑगस्ट पासून सुरू होणार- विजय वडेट्टीवार

राज्यातील शाळा ०३ ऑगस्ट पासून सुरू होणार- विजय वडेट्टीवार

0

विद्यार्थी आणि पालकवर्ग शाळा कधी उघडणार या प्रश्नात गुंतलेले असताना राज्याचे मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शाळा ह्या ०३ ऑगस्ट पासून सुरू करण्यासाठी सर्वाना तयारी करण्याचे सांगितले आहे. शाळा सूरु करण्यापूर्वी शाळेच्या प्रशासनाने संपूर्ण तयारी करावी असे त्यांनी गडचिरोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले आहे.

“शासनाचा ०३ ऑगस्ट पासून सर्व शाळा सुरू करण्याचा मानस आहे, त्यापूर्वी शाळेने संपूर्ण परिसराचे निर्जंतुकिकरण करावे आणि विद्यार्थी शिक्षकांसाठी मास्क आणि सॅनिटायझर ची व्यवस्था पुरेपूर करण्यात यावी”, अशी सूचना विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली मध्ये दिली आहे, सामना मुखपत्रातून या बद्दल बातमी छापून आली आहे.

दरम्यान देशभरात अनेक राज्यांनी ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याची पूर्ण तयारी केली असून या बद्दल अधिकृत घोषणा सुद्धा केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यांना त्यांच्या राज्यातील पालकांसोबत विचार विनिमय करून शाळा उघडण्याची तारीख आजपर्यंत केंद्राला कळवण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार महाराष्ट्र राज्याने अधिकृत घोषणा केलेली नाही, वडेट्टीवार यांनी एका मीटिंग मध्ये सदर बाब सांगितली आहे. मुंबईच्या ७०% पालकांचा शाळा ऑगस्ट मध्ये उघडण्यास संपूर्ण नकार असल्याने राज्य शासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.