Home महाराष्ट्र शाळा कॉलेज सुरू करणार, पावसाळ्या अगोदर लॉकडाऊन संपवावे लागणार,: उद्धव ठाकरे

शाळा कॉलेज सुरू करणार, पावसाळ्या अगोदर लॉकडाऊन संपवावे लागणार,: उद्धव ठाकरे

0

आज उद्धव ठाकरे यांनी fb वर लाईव्ह येत महाराष्ट्राला संबोधित केले, त्यावेळी ते म्हणाले
“प्रत्येकाला अनेक प्रश्न पडले आहेत, की हा लॉकडाऊन कधी संपणार, किती काळ सुरू राहणार? पण याची उत्तरे कुणालाही माहिती नाहीत. हे एक भीषण एकतर्फी युद्ध आहे”,

“जर मार्च पासून आपण उपाय योजना केल्या नसत्या तर कोरोना रुग्णांची संख्या अंगावर काटा आणलेली असू शकली असती. आपण रेड , ऑरेंज आणि ग्रीन सिस्टिम सुरूच ठेवणार आहोत. रेड झोन मध्ये फार काही सुरू करणार नसलो तरी ऑरेंज आणि ग्रीन झोन जिल्ह्यांमध्ये आपण हळू हळू सर्व काही सुरू करत आहोत”

आपण अनेक देशांचे उदाहरण सद्या बघू शकतो की ज्यांनी लॉकडाऊन हटवले आणि नंतर मात्र परिस्तिथी सुधारण्या ऐवजी बिघडत गेली आणि परत, लॉकडाऊन करावा लागला. आपण मात्र असे करणार नसून हळूहळू सर्व काही पूर्वरत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. काहीही झाले तरी पावसाळ्या अगोदर आपल्याला लॉकडाऊन संपवावे लागेलचं. तसेच शाळा आणि कॉलेजेस च्या नवीन वर्षांच्या प्रवेश प्रक्रिया यांसाठी आपण सुरवात करणार आहोत आणि लवकरचं आपण शाळा कॉलेजेस सुरू करणार आहोत.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.