Home महाराष्ट्र मनसेचा नवा झेंडा! 23 जानेवारीला घोषना; पहा का बतलतंय मनसे झेंडा?

मनसेचा नवा झेंडा! 23 जानेवारीला घोषना; पहा का बतलतंय मनसे झेंडा?

0

राज्याचं राजकारण एक नव्या वळणावर आहे, जे असं होईल अशी यापूर्वी कुणी अपेक्षाही केली नसेल. मात्र राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळणार आहे असे दिसत आहे. भाजपशी युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राज्यात सरकार सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका थोडी थंडावली आहे. परिणामी हीच संधी साधून शिवसेनेचे कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्या पारड्यात खेचण्यासाठी मनसे नव्याने पाऊलं उचलणार आहे. त्याच बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून अपयश पत्करणाऱ्या मनसेने नवे बदल करणे स्वीकारले आहेत.

मीडिया रिपोर्ट नुसार मनसे आपल्या पक्षाचा रंगीत ध्वज बदलून भगवा किंवा केसरी ध्वज स्वीकारणार आहे. याउलट रेल्वे इंजिन ऐवजी छत्रपतींची राजमुद्रा असणार आहे अशी माहिती मिळत आहे. न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टनुसार मनसेच्या या नव्या भगवीकरणाचं पुण्याच्या शिवसैनिकांनी स्वागत केलं असून काहीनी तर अगदी मनसेला सेनेत विलीन करण्याचा सल्ला देखील दिला आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेचं महा अधिवेशन पार पडणार असल्याचं सांगितलं जातं आहे. तेव्हाच या नव्या बदलाची घोषणा होणार असं म्हटलं जातं आहे.