Home महाराष्ट्र ‘शोले’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कालिया’ काळाच्या पडद्याआड : ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे...

‘शोले’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कालिया’ काळाच्या पडद्याआड : ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन…

0

मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रात काम करून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, ‘शोले’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कालिया’च्या भूमिकेद्वारे घराघरात व भारतीयांच्या हृदयात जागा मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते दरम्यान ७८ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने व दिवसेंदिवस तब्येत खालावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय करून त्यांनी रसिकांची मने जिकली. त्यांची शोले व अंदाज अपना अपना या चित्रपटातील भूमिका विशेष गाजली.

विजू खोटे अभिनय रुपात कायम रसिकांच्या मनात जिवंत राहतील. मीडिया न्यूज नुसार त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.