Home महाराष्ट्र म्हणून शरद पवारांच्या एका फोन मुळे उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींनी समर्थनपत्र देण्यास...

म्हणून शरद पवारांच्या एका फोन मुळे उद्धव ठाकरेंना सोनिया गांधींनी समर्थनपत्र देण्यास टाळलं

0

प्राईम नेटवर्क : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा वाद दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. सुरुवातीला भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली. नंतर ही संधी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला मिळाली. दरम्यान राज्यपालांनी दिलेल्या वेळेत सत्ता स्थापन करणे शक्य नाही हे लक्षात येताच शिवसेनेने राज्यपालांकडे तीन दिवसांचा वेळ मागितला होता; ज्याला राज्यपालांनी नकार दिला. राज्यपालांच्या या भूमिकेच्या विरोधात शिवसेना आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार अशी चर्चा आहे.

मात्र दुसरीकडे शरद पवारांनी पुन्हा एकदा खेळी केल्याचं समजतंय, उद्धव ठाकरे सोनिया गांधींकडे पाठिंब्याचं समर्थनपत्र मागायला गेले असताना, सोनिया गांधी आणि शरद पवार यांचं फोन वर बोलणं झालं, यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तात्काळ समर्थनपत्र न देण्याविषयी सोनिया गांधींना संकेत दिले, महाराष्ट्रात कोण सत्ता स्थापन कारणा हे अद्याप स्पष्ट नसल्याने, अशा वेळी सत्तेच्या चाव्या कुठेही फिरू शकतात, हे लक्षात आल्याने शरद पवारांनी सोनिया गांधींना फोन करून उद्धव ठाकरेंना तात्काळ समर्थनपत्र न देण्याचे संकेत दिले, यामुळे सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना समर्थनपत्र देण्यास असमर्थता दर्शविली आहे. हि शरद पवारांची खेळी संजयची कि धुर्तपणा हे समजणं अवघड असेल.

हे सुध्दा वाचा :

शिवसेना जाईल का पुन्हा नांदायला सासरी, जाऊ बाई जोरात, सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडे पर्याय काय?

सत्तेसाठीची धावपळ संजय राऊतांना अखेर महाघात पडली, ऍन्जोप्लास्टी शस्त्रक्रियेवर बेतलं

काँग्रेसने शिवसेनेला अधिकृत पाठींबा दिला नाही. परिणामी शिवसेनेला काही वेळेची गरज होती. मात्र राज्यपालांनी शिवसेनेची मागणी फेटाळून तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं असून सत्तास्थापनेसाठी २४ तासांचा वेळ दिला आहे.