Home महाराष्ट्र कलम ३७० आणि त्यावर शरद पवारांची धूर्त राजकीय खेळी पाहून चकित व्हाल

कलम ३७० आणि त्यावर शरद पवारांची धूर्त राजकीय खेळी पाहून चकित व्हाल

0
sharad pawar

प्राईम नेटवर्क : सोमवारचा दिवस सर्वांसाठीच आश्चर्याचा ठरला. काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा जमा झाल्यावर काश्मीरच्या फुटीरवादी नेत्यांचे आधीच धाबे दणाणले होते. यावर फुटीरवाद्यांनी एकत्र येत पुन्हा एकदा आपली गरळ ओकण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधान मोदींनी त्यांचे प्रयत्न विफल केले. सोमवारी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत आणण्या अगोदरच फुटीरवाद्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं, काश्मीर मधील परिस्थिती चिघळू न देण्याची आधीच काळजी घेतली गेली.

तर दुसरीकडे मोदी सरकारने सोमवारी अचानक कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत आणल्याने विरोधकांना या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचं नियोजनच करता आलं नाही. पर्यायाने विरोधकांचा विरोध मवाळ झाला, अचानक प्रस्ताव आल्याने विरोधकांना प्रस्तावाच्या विरोधात आघाडी सुद्धा करता आली नाही. याचा थेट फायदा प्रस्ताव पास करण्या साठी झाला. सरकारच्या या रणनीती मुळे आम आदमी पार्टी, तेलगू देसम, बहुजन समाजवादी पार्टी यां सारख्या पक्षांनी विरोध करण्याच्या राजकारणात न पडता या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं.

यावेळी विरोधकां सह राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा कलम ३७० आणि त्याच्या फायद्या तोट्यावर न बोलता या प्रस्तावाच्या तांत्रिक मुद्द्यावर बोलणं अधिक पसंत केलं. हा प्रस्ताव आणून सरकारने कसा धोका केला आहे ? हा कसा विश्वासघात केला आहे, हेच पटवून देणं अधिक योग्य समजलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने असं म्हटलं कि, या प्रस्तावाला आमचा विरोध नाही, पण ते ज्या प्रकारे राज्य सभेत पेश केलं, त्याला मात्र आमचा विरोध आहे, शरद पवारांच्या मते, कलम ३७० हटवण्यासाठी सरकारने स्थानिक नागरिकांशी आणि नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र शरद पवार त्या नेत्यांशी चर्चा करायला सांगत आहेत, ज्यांना आत्ता पर्यंत फक्त पेटवायचं माहीत होतं, विझवायचं नाही…

ज्यांनी कलम ३७० चा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करत भारताला फक्त आणि फक्त धमक्या दिल्या. गरज पडल्यास पाकिस्तान कडून पैसे उकळत दहशतवादाला खतपाणी घातलं. सैन्यावर दगड फेक केली, स्थानिकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. अशां फुटीरवादी नेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शरद पवार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे खासदार अडून बसले आणि मतदानास स्पष्ट नकार देत वाकआऊट करणं पसंत केलं. म्हणजे एकीकडे आमचा कलम ३७० हटवण्यास विरोध नाही असं म्हणायचं, आणि दुसरीकडे मतदानास नकार द्यायचा. विश्वास बसणार नाही मात्र शरद पवारांनी पुन्हा एकदा कलम ३७० वर राजकारण खेळण्याची धूर्त खेळी केली आहे.

सध्या काँग्रेस ला वाली नसल्याने विरोधकांमध्ये तिचं अस्तित्व असून नसल्या सारखं आहे. त्यामुळे शरद पवारांनी याचा फायदा उचलत, फुटीरवादी नेते, आणि या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या इतर पक्षांची मर्जी कायम राखली आहे. याचा फायदा शरद पवार आणि राष्ट्रवादीला विरोधकां मधील आपलं स्थान भविष्यात अधिक मजबूत करण्यासाठी होऊ शकतो.

म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने जर राष्ट्रवादी किंवा शरद पवारांना विचारलं, कि तुम्ही काश्मिर मधून कलम ३७० हटवण्याच्या बाजूने मतदान का केलं नाही ? तर त्यांच्याकडे उत्तर असेल, कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव तांत्रिक दृष्ट्या अयोग्य होता. मात्र दुसरीकडे काश्मीर मधील फुटीरवादी नेते, म्हणजे मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, ममता बॅनर्जी यां सारख्या नेत्यांनी किंवा पक्षांनी विचारल्यास त्यांच्याकडे उत्तर असेल, मतदान न करता वाक आऊट करून आम्ही फक्त तुमच्या साठीच विरोध दर्शवलाय आणि तुम्हाला मदत केलीये.

मात्र शरद पवारां सारखं दोन दगडांवर पाय ठेवत तोल साधनं हे सर्वांनाच जमतं असं नाही, यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी जमेल तसे कोसणारे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी मात्र काश्मीर मधून कलम ३७० हटवण्याच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.