Home महाराष्ट्र शिवसेनेने अंगीकारले आपापले मतदारसंघ मजबूत करण्याचे धोरण; आता कामे वेगाने होणार.

शिवसेनेने अंगीकारले आपापले मतदारसंघ मजबूत करण्याचे धोरण; आता कामे वेगाने होणार.

0

मागील दोन वर्षात जनतेच्या आयुष्यात गुणात्मक बदल करणाऱ्या कामांची यादी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत: शिवसेना आमदारांकडून मागवत असून ती कामे वेगाने मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यांतर्गत कोरोना परिस्थिती चा आढावा घेतानाच शिवसेनेच्या आमदारांच्या विभागवार बैठका सुरु केल्या आहेत. आमदारांनी निधी मिळत नाही , कामे होत नाहीत अशा तक्रारींचा पाढा वाचला असून त्याची नोंद मुख्यमंत्री कार्यालयातील आयएएस अधिकारी उध्दवजींच्याच उपस्थितीत घेत आहेत. त्यामुळे कामे आता जोरात होतील अशी लक्षणे दिसत आहेत.

काल उत्तर महाराष्ट्रातील सर्व सेना आमदारांची व्हर्च्युअल मिटींग झाली. आज दुपारी विदर्भातील आमदारांशी संवाद साधला.आमदारांनी त्या त्या भागातील मंत्री हजर असतानाच आपल्या काय मागण्या आहेत , रेंगाळलेली कामे नेमकी कोणती याची माहिती उध्दव ठाकरे यांना देण्याच्या या मोहिमेला काल प्रारंभ झाला. तसेच , आमदारांची कामे कोणती, त्यात अडचणी कोणत्या हे आशीषकुमार सिंग आणि खारगे या दोन सचिवांना कळवले जाते आहे. काही अडचणीच्या विषयात या अधिकाऱ्यांशी नेटवरून संपर्कही साधला जातो आहे.