महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा वाद दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चालला आहे. सुरुवातीला भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता व्यक्त केली. नंतर ही संधी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला मिळाली. दरम्यान राज्यपालांनी दिलेल्या वेळेत सत्ता स्थापन करणे शक्य नाही हे लक्षात येताच शिवसेनेने राज्यपालांकडे तीन दिवसांचा वेळ मागितला होता; ज्याला राज्यपालांनी नकार दिला. राज्यपालांच्या या भूमिकेच्या विरोधात शिवसेना आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार अशी चर्चा आहे.
काँग्रेसने शिवसेनेला अधिकृत पाठींबा दिला नाही. परिणामी शिवसेनेला काही वेळेची गरज होती. मात्र राज्यपालांनी शिवसेनेची मागणी फेटाळून तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं असून सत्तास्थापनेसाठी २४ तासांचा वेळ दिला आहे.