Home महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना उदयनराजेंचा टाटा ! शिवस्वराज्य यात्रेला उदयनराजेंची दांडी !

राष्ट्रवादीच्या नेत्यांना उदयनराजेंचा टाटा ! शिवस्वराज्य यात्रेला उदयनराजेंची दांडी !

0
udayanraje bhosle

प्राईम नेटवर्क : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात सातार्यात पोहचली आहे. सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे या यात्रेचे स्टार कँपेनर म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं, मात्र राज्यात फिरत असताना, उदयनराजेंनी या यात्रेकडे पाठ फिरवलीच, मात्र चक्क सातार्यात सुद्धा या यात्रेचं स्वागत सुद्धा त्यांनी केलं नाही, कि राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर सुद्धा उदयनराजे फिरकले नाहीत.

उदयनराजेंच्या या पवित्र्यामुळे उदयनराजे येणाऱ्या काही दिवसात लवकरच राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. उदयनराजेंच्या या पवित्र्यामुळे खुद्द राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये सुद्धा नाराजी असल्याचं समोर आलं . या यात्रेचं साताऱ्यात आगमन झालं मात्र उदयनराजेंनी अनुपस्थिती हि चर्चेचा विषय ठरली आहे. उदयनराजेंनी नाराजी पाहता, लवकरच साताऱ्यातून पक्षबदल झाल्याची बातमी आल्यास आश्चर्य वाटायला नको.

राष्ट्रवादी मध्ये फक्त आडवा आणि जिरवा, साताऱ्याचा विकास फक्त मुख्यमंत्र्यांनीच केला : उदयनराजे