Home महाराष्ट्र राज्यात ५० ठिकाणी २६ जानेवारीला शिवभोजन योजनेचा शुभारंभ!

राज्यात ५० ठिकाणी २६ जानेवारीला शिवभोजन योजनेचा शुभारंभ!

0

१० रुपयांत जेवण या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून येत्या २६ जानेवारीला या योजनेचा राज्यात शुभारंभ होत आहे. ज्यात सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात पौष्टीक व मुबलक जेवण मिळणार आहे. या थाळीत १० रुपयांमध्ये दोन पोळ्या, भाजी, वरण आणि भात यांचा समावेश असणार आहे. ABP ‘माझा’च्या रिपोर्ट नुसार शिवभोजन योजनेसंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल आढावा बैठक घेतली.

मिळालेल्या अधिक माहिती नुसार शिवभोजन केंद्र चालवण्याकरीता जास्तीत जास्त महिला बचतगटांची निवड करण्यात येणार असून केंद्र चालवणाऱ्या महिलांना व पुरुषांना प्रशिक्षण देण्यात येईल. ३ महिन्यांसाठी या योजनेला ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सामान्यतः एका भोजनालयामध्ये ५०० थाळ्या सुरु करायला मान्यता मिळाली आहे. शिवभोजनाचा लाभ बारा ते दोन या वेळेत घेता येईल, थाळीमध्ये प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा भात आणि १०० ग्रॅमचे एक वाटी वरण या पदार्थांचा समावेश असणार आहे. २६ जानेवारी रोजी राज्यात पहिल्या टप्प्यात ५० पेक्षा अधिक ठिकाणी शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.