Home महाराष्ट्र भाजप कडून आमदार फोडले जाण्याची भीती! आमदारांना अज्ञात ठिकाणी हलवणार: राऊत म्हणाले...

भाजप कडून आमदार फोडले जाण्याची भीती! आमदारांना अज्ञात ठिकाणी हलवणार: राऊत म्हणाले “ही अफवाच”

0

अखेर राजकीय हालचालींनी चांगलाच वेग घेतला आहे. आज भाजप राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. अशात शिवसेनेने मातोश्रीवर आमदारांची बैठक घेतली आहे व या बैठकीनंतर आमदारांना अज्ञात पंचतारांकित हॉटेलात हलवण्यात येणार आहे. अशी चर्चा आहे की सत्ता स्थापनेसाठी भाजप कडून आमदार फोडले जाण्याची भीती असल्याने शिवसेनेने हे पाऊल उचललं आहे. जेणेकरून भाजपला शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधता येणार नाही.

मात्र संजय राऊत यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला आहे. ते म्हणाले, “आम्हाला असं काहीही करण्याची मुळात गरज नाही. आमचे आमदार हे त्यांच्या भूमिकांवर ठाम आहेत. पक्षासाठी ते समर्पकपणे काम करत आहेत. बैठक संपल्यानंतर सर्व आमदार हे मतदार संघात परतणार असून ते पुन्हा आपल्या कामाला लागतील.” असे म्हणत, ‘अशा अफवा पसरवणाऱ्यांनी आता काळजी करावी.” असा टोला देत ‘आमदारांना अज्ञात पंचतारांकित हॉटेलात हलवण्यात येणार’ या गोष्टीला राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.