माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुंबईत घडली आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आली या दुःख आणि संतापटून देश बाहेर येतो न येतो तोच मुंबईत आणखीन एक हृदयद्रावक प्रकार समोर आला. कुर्ला परिसरात एका सहा वर्षांच्या बालिकेवर एका नराधमानं बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहीत नुसार, कुर्ला पश्चिमेकडील विजय महल चाळीजवळ सदर गुन्हेगारांचे दुकान आहे. या नराधम दुकानदाराने सहा वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्यानं बोलावून अत्याचार केला. मिळालेल्या माहिती नुसार दुकानाबाहेर खेळणाऱ्या मुलीला चॉकलेट देतो असे सांगून त्यानं तिला दुकानात बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. चिमुकली जेंव्हा घरी परतली तेव्हा तिला असह्य वेदना होऊ लागल्या, आईने विचारलं असता मुलीने आईला कुणी-केले ते सांगितले. चुमुकलीला ताबडतोब दवाखान्यात लावण्यात आले. डॉक्टरकडे नेले असता, लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नराधम दुकानदाराबाबत मुळेने सांगताच प्रथम तिच्य पालकांनी पोलीसात तक्रार केली गुन्हेगार दुकानदाराला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी चालू आहे.