दिवाळी म्हटलं की तरुणांना आठवते मजा, मस्ती, भरपूर फटाके आणि पोटभर फराळ! पण या दिवशी लोकांना काहीतरी सोशल मॅसेज द्यावा असा विचार कधीच कुणी केला नसेल. मात्र शिरूर मधील काही तरुण याला अपवाद ठरले आहेत. ज्याप्रमाणे आपण दिवाळीत घरी दिवे लावतो त्याचप्रमाणे या तरुणांनी स्मशानात दिवे लावले. त्यांनी असं का केलं हे पाहण्या पूर्वी आवर्जून सांगावे लागेल की या तरुणांचं सर्वस्त्रं कौतुक केलं जातं आहे.
दिवाळीच औचित्य साधून शिरूर तालुक्यातल्या तरूणांनी एक भन्नाट प्रयोग केला. या तरुणांनी स्मशानभूमीत दिवे लावून दिवाळी साजरी केली. अनेक खेड्यांमध्ये बऱ्याचदा अशी अंधश्रद्धा असते की अमावस्येच्या रात्री स्मशानभूमीत जाऊ नये. या दिवशी स्मशानभूमीत भूतांचा वावर असतो. या अंधश्रद्धेचा नायनाट करण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या मनात असणारी भीती घालवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली.
गावातील सर्वसामान्य लोकांनी अंधश्रद्धेला भुलू नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये याकरता या तरुणांनी केलेला हा खटाटोप सत्कारणी लागला आहे व सर्वस्त्रं या तरुणांचं कौतुकही केलं जात आहे.