आपल्या दिलखुलास भाषणांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसिद्ध आहेत. माळेगाव कारखान्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत नुकताच कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी शासकीय घराबद्दल आपली खंत व्यक्त केली. ABP माझाच्या रिपोर्टनुसार “बारामतीतले कार्यकर्ते काही कामाच्या निमित्तानं मुंबईत येतात. त्यावेळी मी नाराज होतो.” असं सांगत त्यांनी “मुंबईतलं घर लहान आहे. १०० दिवस झाले तरी काय करतोय बाबा कुणास ठाऊक शासकीय निवासस्थान रिकामं होत नाही” असं म्हणत खत व्यक्त केली.
मीडिया रिपोर्ट नुसार अजित पवार म्हणाले, “मुळात आताच घर लहान त्यात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना बेडरूममध्ये बसवावं लागतं आणि आता तर अशी वेळ आलीये की माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवावं लागेल. तिथे जर कार्यकर्त्यांसोबत बसलो तर बायको मला हाकलून देईल.” असं म्हणताच कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.