Home महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनलॉक ४ च्या गाईडलाइन्स जाहीर…

राज्य सरकारकडून अनलॉक ४ च्या गाईडलाइन्स जाहीर…

0

केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारनं अनलॉक ४ च्या गाईडलाइन्स जाहिर केल्या आहेत यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. 1 जूनपासून काही प्रमाणात राज्यातील गोष्टी हळूहळू पूर्वी प्रमाणे चालू व्हायला सुरुवात झाली होती. आता 1 सप्टेंबर पासून अनलॉक ४ जारी केल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिथिल झाल्या आहेत.

आता जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज नसणार आहे. हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहे. तसेच आतापर्यंत मुंबई मध्ये 100 विमानांच्या उड्डाणालाच परवानगी होती ती आता दुप्पट करण्यात आली आहे.

अनलॉक-4 मध्ये काय सुरू होणार काय बंद राहणार…

सिनेमागृह 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंदच.

-मंदिर आणि जिमबद्दल अद्याप कोणतीही घोषणा नाही.

-सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स आणि बिअर बारवरील बंदी कायम.

हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार.

-शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार.

-30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही.

-खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा.

त्याव्यतिरिक्त इतर राज्यात 50 टक्के आता कर्मचारी उपस्थित राहू शकतात या सर्व कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स या नियमावलीचे पालन करणे अनिवार्य राहील.

  • जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी आता ई-पास गरज नाही.
  • प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा.
  • खासगी चारचाकी वाहनात चार लोकांना प्रवास करण्याची मुभा.

-50 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही. तसेच अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकणार नाही.