Home महाराष्ट्र ‘त्या’ व्हायरल व्हिडिओची राज्य सरकारने घेतली दखल; आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम हाती घेणार

‘त्या’ व्हायरल व्हिडिओची राज्य सरकारने घेतली दखल; आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम हाती घेणार

0

व्हाट्सऍप वरून कायम कुठल्याही गोष्टी फॉरवर्ड होत होत व्हायरल होत असतात. तसाच एक प्रकार रविवारी ३१ ऑगस्टला झाला. १८०० रुपायांवरून काही मुलांसोबत वाद करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ काल प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओतील महिला बहुधा घरकाम करणारी स्त्री असावी जिला त्या तरुणांनी १८०० रुपये दिले होते. पण हिशोब येत नसल्याने म्हणा किंवा काहीतरी गैरसमजामुळे आपल्याला १८०० रुपये मिळाले नाहीत असे त्या महिलेचे म्हणणे होते. या व्हिडिओमुळे अनेक लोकांचे मनोरंजन झाले. त्यावर नंतर कित्येक मिम्सही लोकांनी बनवले.

मात्र लोकांसाठी हा एक मनोरंजनाचा विषय झालेला असला तरी राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एका फेसबुक पोस्टमधून याबद्दलचे आपले मत व्यक्त केले.

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान…

Publiée par Adv. Yashomati Thakur sur Dimanche 30 août 2020

या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, “घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये.” तसेच ही घटना त्या आव्हान म्हणून पाहत असून आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम लवकरच हाती घेणार असल्याचेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले.