Home महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा शपथविधी रोखणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली : उद्धव ठाकरे सुखावले

मुख्यमंत्री पदाचा शपथविधी रोखणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली : उद्धव ठाकरे सुखावले

0

विधानसभा निवडणुका झाल्या दिवसापासून तर आज तागायत अनेक घडामोडी झाल्या ज्यांची राज्यातील जनतेने कधी अपेक्षाही केली नसेल. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी आज देवेंद्र फडणवीसांना एवढ्या 2-3 दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि आज बहुमत मिळून सुद्धा  भाजप विरोधी पक्ष होणार आहे. मागील अनेक दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर शेवटी के तो निर्णय ठरला आहे. भाजपला दिलेल्या ठराविक वेळात सत्ता स्थान न करता आल्याने आता २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी रोखण्यात यावा यासाठी हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे अशी माहिती मिळत आहे. अर्थात आता शपथविधी होणार हे नक्की!!