Home महाराष्ट्र टॅक्सी चालकाच्या गैरवर्तनाची सुप्रिया सुळेंनी केली रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार

टॅक्सी चालकाच्या गैरवर्तनाची सुप्रिया सुळेंनी केली रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार

0

प्राईम नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत काल दादर रेल्वे स्थानकावर टॅक्सी चालकाने गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी त्यांनी ट्विटद्वारे रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती..

त्यांच्या सांगण्यानुसार दादर रेल्वे स्थानकावर कुलजीत सिंग मल्होत्रा नामक टॅक्सी चालक ट्रेनमध्ये चढून टॅक्सी सेवेसाठी विचारीत होता व त्याला दोन वेळा नकार देऊनही तो मार्ग अडवत होता. एवढेच नाही तर त्याने फोटोसाठीही विचारणा केल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या संबंधात त्यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असता त्यांनी तेथील आरपीएफ च्या मदतीने त्या टॅक्सी चालकास अटक केले असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

तसेच सुप्रिया सुळेंनी या घटनेबद्दलची ट्विट केल्यानंतर इतर महिलांसोबतही असे गैरप्रकार घडले आहेत हे समोर येत आहे. रेल्वे स्थानकावर तसेच विमानतळावर टॅक्सी सेवेची विचारणा करणे हे कायद्यानुसार अमान्य आहे, एकप्रकाच गुन्हा आहे असे त्यांनी सांगितले. प्रवाश्यांना तसेच विशेषतः महिलांना असे अनुभव पुन्हा येऊ नये यासाठी रेल्वेमंत्र्यांनी या प्रकरणाची तसदी घ्यावी अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.