प्राईम नेटवर्क : सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, यावेळी पक्षातील स्थानिक गटबाजी चव्हाट्यावर आली. या कार्यकर्ता मेळाव्यात चक्क सुप्रिया सुळे यांच्या समोरच संजय वाकचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी जबरदस्त गोंधळ घातला. यावेळी सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या. हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभा केलाय, पक्षाला कोणी बदनाम करायचा प्रयत्न केलास, तर गाठ माझ्याशी आहे. असा सज्जड दम यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला.
पैठणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरु असतानाच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. दोन गटांत झालेला गोंधळ इतका वाढला कि सुप्रिया सुळेंना काही वेळा साठी आपलं भाषण थांबवावं लागलं. सुप्रिया सुळेंनी ऍक्शन मध्ये येत, गोंधळ घटलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवली हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभा केलाय, पक्षाला कोणी बदनाम करायचा प्रयत्न केलास, तर गाठ माझ्याशी आहे. असा सज्जड दम यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला.
दरम्यान हा कार्यकर्त्यांचा हा गोंधळ तिकीट वाटपा वरून झाल्याचं समोर आलं, दुसऱ्या गटाला तिकीट दिल्याने एक गट नाराज होता, यामुळे सुप्रिया सुळे यांच्या समोरच यावेळी या गटाने तुफान राडा केला.