गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की पावसाचा अंदाज नसतांनाही पावसाने जोर धरला आहे. नागपूरसह विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे लोकांची अत्यंत खराब परिस्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमधील अनेक गावांना महापुराचा प्रचंड फटका बसला आहे. इतकेच नाही तर नागपूर आणि विदर्भात १९९४ नंतर आलेला हा सर्वात मोठा पूर आहे. या सगळ्या परिस्थिती मुळे लोकांचे खूप हाल झाले तर पूरग्रस्तांना सगळ्या प्रकारे मदत केली जावी अशी सगळ्यांची इच्छा होती.मात्र आता ठाकरे सरकारने पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र सरकारतर्फे पूरग्रस्त भागातील लोकांसाठी आणि त्यांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी तब्बल १६.५० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. तसेच त्यांचे जीवन हे विस्कळीत झाले होते.
अचानक पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे गावांमध्ये अक्षरशः पाणीच पाणी झाले होते.बऱ्याच लोकांची घरे सुद्धा वाहून गेली. याचीच दखल घेत सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.तसेच यातून बेघर झालेल्या नागरिकांना पुन्हा घर बांधून देणार येणार आहे तसेच ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना ती केली जाणार आहे आणि नागरिकांसाठी रोजच्या गरजेच्या वस्तू, धान्य, खाण्यापिण्याची सोय करण्यात येणार आहे.