Home महाराष्ट्र ठाकरे सरकार ११ दिवसांमध्ये कोसळणार : नारायण राणे

ठाकरे सरकार ११ दिवसांमध्ये कोसळणार : नारायण राणे

0

नुकत्याच आलेल्या एका मीडिया रिपोर्टनुसार ‘महाविकास आघाडीने एकत्र येवून बनवलेले सरकार येत्या ११ दिवसांत कोसळणार’ असल्याचे भाकीत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केले आहे. भिवंडी येथील सभेत ते बोलत होते.
आमदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामान्यांच्या उदघाटन प्रसंगी नारायण राणे उपस्थित होते. “राज्याची सद्यस्तिथी पाहता ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी कोसळेल अशी स्तिथी आहे. तरीसुद्धा मी त्यांना ११ दिवस अजून वाढवून देतो” असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले. “हे सरकार जनतेच्या हिताचे कुठलेच काम करू शकले नाही, यांनी फक्त आश्वासनं दिली पण त्यांची पूर्ती करण्याची धमक ना मुख्यमंत्र्यात आहे ना या सरकारमध्ये. फक्त सत्तेसाठी व पदांसाठी हे एकत्र आले आहेत. सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता असे सरळ सरळ यांच्या मिलापाचे कारण आहे” असा दावा त्यांनी केला.

CAA ला प्रथम समर्थन, नंतर परत विरोध व आता मोदीभेटीनंतर परत समर्थन. एका अर्थाने चांगले झाले. शिवसेना भाजप परत एकत्र येणार का असे विचारता ‘मी ज्योतिषी नाही’ असा टोला त्यांनी लगावला तर भविष्यात काहीही होऊ शकतं. आता पुढच्या ११ दिवसात काय होणार आहे हे पाहणे हे आपल्या हाती आहे असे ते म्हणाले.

पहा संपूर्ण विडिओ