शिवसेनेसाठी आजचा दिवस अगदी ऐतिहासिक दिवस असणार आहे. बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण होणार असून उद्धव ठाकरे पुढील तासाभरात शिवाजी पार्कात मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतील. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून कालपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा चालू होती की ठाकरे परिवाराचे सदस्य आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे शपथविधी सोहळ्यात येणार का? याचा खुलासा झाला असून आता या चर्चला पूर्णविराम लागणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शपथविधीसाठी आवर्जून हजर राहणार आहेत कारण, स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोन करून त्यांना निमंत्रण दिलं होतं. मीडिया न्यूज नुसार राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक शुभेच्छा दिल्या असून नक्की येणार असं सांगितलं आहे. राज ठाकरे सहकुटुंब येतील याची खात्री नाही कारण त्यांचा मुलगा अमित ठाकरे त्यांच्या आयुष्यातील पहिल्या मोर्चाचं आज नेतृत्व करणार आहे. एकीकडे शपथविशी आणि एकीकडे हा मोर्चा असल्याने फक्त राज ठाकरेच या शपथविधी सोहळ्यात सहभागी राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.