राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने राज्य सरकार कठोर पाऊलं उचलत आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, “कोरोना विषयी सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देत असतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल.”
“एक लक्षात घ्या, कालचा दिवस होता त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहे. सर्वांनी जनता कर्फ्यू चांगला पाळला. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर ते वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी होते”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठीच सुरु राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच रिक्षा, टॅक्सी मधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. खासगी वाहनेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू राहतील. टॅक्सीमध्ये एक चालक आणि दोन प्रवासी तर रिक्षामध्ये एक चालक आणि एक प्रवासी असतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील, कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहील असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पहा उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण: