Home महाराष्ट्र पुण्यातील ‘हा’ बॅनर सोशल मीडियावर होतोय झपाट्याने व्हायरल : सत्तास्थापनेच्या नव्या समीकरणाचे...

पुण्यातील ‘हा’ बॅनर सोशल मीडियावर होतोय झपाट्याने व्हायरल : सत्तास्थापनेच्या नव्या समीकरणाचे संकेत?

0

राज्यात भाजप-शिवसेना यांच्यातील सत्तास्थापनेचा वाद विकोपाला गेला असून महायुतीचं सरकार राज्यात येईल यावर शंका व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पुण्याच्या एका बॅनरने आणखीनच भर घातली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रवादीचे अनिस सुंडके यांनी सदर पोस्टर लावलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेला पोस्टर लावण्यात आला असून यावर “महाराष्ट्रातील जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने संघर्षातील आदेश स्वीकारला आहे. बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेत धनुष्यबाणातील अचूक वेधाने जाणता नेता स्वीकारावा.” असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. हा बॅनर सोशल मीडिया युजर आणि पुणेकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. ज्या परिस्थितीत व काळात हा बॅनर पुण्यात लावण्यात आलेला आहे त्यावरून नव्या समीकरणाचे संकेत तर दिले नाहीत ना याचीच चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

पुण्यात काही ठिकाणी अशा प्रकारे बॅनर लागले आहेत !

Publiée par Supriya Sule FC sur Vendredi 8 novembre 2019

भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेचा प्रश्न सोडविण्यासाठी काय करता येऊ शकतं यावर चर्चा झाली. तूर्तास विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपाल या परिस्थितीवर पुढील निर्णय काय घेतात याची वाट बघणार असल्याचं सांगितले आहे. म्हणून राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेना आघाडीच्या मदतीने सत्तेत सहभागी होणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.