Home महाराष्ट्र कोल्हापूर तर अलमपट्टीच्या धरणात माझ्या मतदार संघातून नक्षलवादी तयार झाल्यास सरकार जवाबदार :...

तर अलमपट्टीच्या धरणात माझ्या मतदार संघातून नक्षलवादी तयार झाल्यास सरकार जवाबदार : धैर्यशील माने

0

प्राईम नेटवर्क : सध्या कोल्हापूर, सांगली मध्ये जोरदार पूरस्थिती अजूनही कायम आहे. शिवसेना आणि कोल्हापूर हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी सरकारी कारभारावर संताप व्यक्त केला आहे. २००५ पेक्षा आता बारा पट अधिक पाऊस पडला असून, संपूर्ण कोल्हापूर परिसर पाण्याखाली आहे. प्रशासनाच्या नियोजनात चूक आणि ढिसाळपणा आहे. असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर तोंडसुख घेतलं. कोल्हापूरमध्ये २० बोटी काम करत होत्या. किती तरी बोटी पंक्चर असल्याचं पाहायला मिळाल्याचं खासदार माने यांनी सांगितलं. बोटींमध्ये बसण्यासाठी नागरिक घाबरत होते. शिरोळ तालुक्यात पुरात हजारो लोक अडकले असताना, तिथे फक्त २० बोटी पाठवण्यात आल्या. हा सरकारी कारभार अत्यंत ढिसाळ आहे. असं म्हणत त्यांनी सरकारी यंत्रणांचे वाभाडे काढले.

एखादा व्यक्ती जरी दगावला तरी त्याला पूर्णपणे प्रशासनच जवाबदार असेल, सध्या जिल्हाधिकारी कार्यालयच शिरोळ तालुक्यात हलवावं अशी भूमिका खासदार माने यांनी घेतली. अलामपट्टी धरणातून विसर्ग वाढवत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. दोन्ही राज्यांनी आपल्या सहमतीने विसर्ग ठरवावा, त्यांची बुडतील म्हणून जर ते माँचे बुडवत असतील तर अलमपट्टीच्या धरणात माझ्या मतदार संघातून नक्षलवादी तयार झाल्यास त्याला सरकार जवाबदार असेल. असं म्हणत खासदार धैर्यशील माने यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान कोल्हापूर मधील पुरस्थितीचा धोका कमी झाला असून, सांगली मधील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.