विधानसभेच्या प्रचाराला आजपासून जोरदार सुरुवात झाली असून उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी जीव तोडुन रस्सीखेच करत आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. मात्र या उलट जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांना भर सभेत अश्रू अनावर झाले. ते म्हणतात, “मी गेली १५ वर्ष बदनापूर मतदार संघात लोकांची सर्व कामे केली. येथील जनतेच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, १५ वर्ष निस्वार्थ सेवा केली. अकोला निकळक गावात ही सभा आयोजित करण्यात आली होती.
मीडिया न्यूज नुसार गेली १५ वर्ष त्यांनी कामे केली तरीही अद्याप त्यांना त्याचं फळ मिळालं नाही. “लोकांच्या अडचणीच्या काळात, सुख-दु:खात सहभागी होऊनही या मतदार संघातून कमी मते मिळतात” असे सांगत बबलू चौधरी यांनी मतदार संघातील लोकांना ‘मला मोठ्या मतांनी निवडून द्या’ असे आवाहन केले. गावकऱ्यांनी देखील चौधरी यांना अश्रू अनावर झाल्यानंतर त्यांची समजूत घालत या निवडणुकीत साथ देण्याचे आश्वासन दिले खरे पण बाजी कोण आरमार हे मात्र निवडणुकीनंतरच ठरेल.