सत्तास्थापनेनंतरही भाजप-शिवसेना यांच्यातील भांडण अद्याप संपलेलं नाही. सत्ताधारी पक्ष असो अथवा विरोधी पक्ष नेते, टीकेची एकही संधी गमावत नाहीत. आता राज्यात भाजप सरकार जाऊन शिवनसेनेचं सरकार आलं आहे. मात्र दोन्हीही पक्षांचे टीकेचे बाण अजून थांबले नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजपावर व मुख्य म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर धक्कादायक आरोप शिवसेनेनं केला आहे.
हाती आलेल्या अधिक माहिती नुसार, “या आधीच्या सरकारने गृहखात्याच्या माध्यमातून सरकार टिकवून ठेवले, तर ‘नगर विकास’मार्फत पक्षाचा आर्थिक विकास करून घेतला” असा आरोप शिवसेनेने भाजपवर केला आहे. शिवसेनेच्या या आरोपावर आता विरोधी पक्षनेते फडणवीस यांची काय भूमिका असेल हे तर वेळच सांगेल.