Home महाराष्ट्र औरंगाबाद येथे घरात घुसून पेटवलेल्या त्या महिलेचा मृत्यू ; आरोपी अटकेत

औरंगाबाद येथे घरात घुसून पेटवलेल्या त्या महिलेचा मृत्यू ; आरोपी अटकेत

0

गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या बऱ्याच हृदयद्रावक घटना ऐकायला येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे कालच प्रसिद्ध झालेली औरंगाबाद येथील महिलेला घरात घुसून पेटवल्याची घटना. कालच्या वृत्तात सांगितल्याप्रमाणे पीडित महिला ९५% भाजली गेली होती. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात या महिलेवर उपचार चालू होते. डॉक्टरांनी तिच्या वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले होते. दुर्दैवाने या महिलेला काल अर्थात बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू आला आहे. 

या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांनी आरोपीला पकडून कोठडीत डांबले आहे. या बातमीने राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. राज्यभरात यावर संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिक करत आहेत. या घटनेबद्दल सविस्तर माहितीसाठी वाचा खालील वृत्त;

दरम्यान अशाच स्वरूपाची एक घटना हिंगणघाट येथे घडली होती. या घटनेतील पीडित महिलेवर उपचार सुरू असून तीदेखील मृत्यूशी झुंज देत आहे.