Home महाराष्ट्र या कारणामुळे झाले होते लोणार सरोवरातील पाणी गुलाबी..

या कारणामुळे झाले होते लोणार सरोवरातील पाणी गुलाबी..

0

गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराचे पाणी हे गुलाबी रंगाचे आढळून आले आहे. ते पाणी हॅलोअर्चिया या सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाल्याची मा हिती पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे ,असे लोकमत मार्फत समजले आहे.

हॅलोअर्चिया हे सूक्ष्मजीव फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखांमध्ये जिवंत राहू शकतात. त्यांच्या माध्यमातून या सूक्ष्मजीवांचा लोणार सरोवरामध्ये प्रवेश झाला असावा, अशी माहिती समोर आली आहे.

या सूक्ष्मजीवाला खारे व आम्लयुक्त पाणी फार आवडतात. तसेच यावर्षी उष्णतेमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे सुर्यकिरनांपासून बचावासाठी ते मोठ्या प्रमाणावर गुलाबी रंगाचा द्रव पाण्यात सोडतात. तसेच त्यांना आवडणारे पाणी मिळाल्यावर त्यांची मोठ्या प्रमाणावर वाढ होते तसेच पोषक वातावरणामुळे त्यांची झपाट्याने वाढ झाली आहे.

इराणमधील सरोवरातील पाणीही अशाच प्रकारे या सूक्ष्मजीवांमुळे इराण येथील उमरिया सरोवरातील पाणीही
गुलाबी झाले होते, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून वरील माहिती दिली आहे.