काही दिवसांपूर्वी रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप असल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आले आहे. मात्र विरोधी पक्षनेते याबद्दल सरकारवर टीका करत आहे. अशातच भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट करून सरकारला खुले आव्हान केले.
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “अर्णब यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना जनता कधीच माफ करणार नाही.” तसेच ‘मी अर्णब यांना भेटायला तळोजा जेलकडे निघालो आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला आव्हान केले. मीडिया न्यूजनुसार याआधी राम कदम यांनी अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेमुळे एक दिवस उपोषण व सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पायी आंदोलन केले होते. त्यानंतर आता ते थेट अर्णब गोस्वामींना भेटायला तळोजा कारागृहाकडे निघाले असल्याचे समजते.