महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘सीएए, एनआरसी आणि एनपीआर’ या मुद्यांवरून ‘ब्राह्मण’ समाजाला लक्ष्य केले. ब्राह्मण लोक हे परदेशातून भारतामध्ये आले आणि तेच आम्हाला देशाचं प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत! असे विधान त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केले असल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
उत्तर नागपूर मधील ‘इंदोरा’ मैदानात ८ मार्चला रोजी महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. राऊत यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. फुले, शाहू, आंबेडकर विचारसंवर्धन समितीने हा सत्कार आयोजित केला होता यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले तसेच ,”हिंदुत्ववादाचा पुरस्कार करीत देशात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने या देशातील हिंदूंनाच परदेशी ठरवून त्यांना आसाममध्ये निर्वासितांच्या छावणीत राहाण्याची वेळ आणली आहे,” असा आरोप केला आहे,”जातीय भांडण लावून पुन्हा या देशात वर्णव्यवस्था निर्माण करून बहुसंख्य ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षड्यंत्र सीएएच्या आणि एनआरसीच्या माध्यमातून रचलं जात असल्याचाही” असेही ते म्हणाले.
तसेच त्यांनी कोणत्याही मुस्लीम बांधवांनी “हिंदुस्थान” बोलणे सोडले पाहीजे, असे आवाहन केले. इथल्या मुस्लिमांनी स्वतःला भारतीय म्हटले पाहिजे आणि हिंदुस्तान सारख्या शब्दांचा वापर न करता बाबासाहेबांच्या मार्गावर चालायला हवे, बाबासाहेबांनी स्वतःला मरेपर्यंत मी फक्त भारतीय आहे कुठल्याच जाती धर्माचा नाही असे म्हटले होते.
पहा संपूर्ण व्हिडिओ: