गेल्या १५ दिवसांपासून चालू असलेली नेते मंडळींची लगबग आज जास्त गती घेणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील सर्व हस्ती रिंगणात उतरणार असून राज्याच्या जिथे जिथे जमेल तिथे जाहीर सभा घेतांना दिसतील. मीडिया न्यूज नुसार मिळालेली माहिती पुढील प्रमाणे…
◾केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अकोले आणि कर्जत येथे सभा होणार आहे.
◾राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बारामतीमध्ये, अकोले व कर्जत येते प्रचारसभा
◾शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पाच सभांना संबोधित करणार अशी माहिती मिळत आहे.
◾मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे शहरात प्रचारसभा घेणार आहेत.
काल साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेनंतर आज शरद पवार यांच्या सभेकडे लोकांचे विशेष लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत त्यात आज रात्रीपासून सर्व प्रकारचा प्रचार बंद होणार म्हणून दिगग्ज नेते मंडळी जनतेला जास्तीत जास्त आपल्या बाजूने खेचण्याचा शेवटचा प्रयत्न करतील.