Home महाराष्ट्र संजय राऊत यांच्या ट्विटमुळे राज्यात चर्चेला उधाण

संजय राऊत यांच्या ट्विटमुळे राज्यात चर्चेला उधाण

0

सत्ता स्थापनेवरून भाजप व शिवसेनेत चाललेली रस्सीखेच सध्या राज्यभरात चर्चेचा विषय आहे. बहुमताने निवडून आलेल्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद भाजपला जाणार की शिवसेनेला हे अजूनही ठरले नाहीये. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री शिवसेनेचाच असावा याबद्दल ठाम आहेत. अशातच त्यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

संजय राऊत यांचे ट्विट पुढीलप्रमाणे:

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है’ असे लिहिले आहे. हे ट्विट भाजपला टोला देण्यासाठी केलं असावं अशी शक्यता प्रसारमाध्यमांतून वर्तवण्यात येत आहे. काल अर्थात मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीसांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली व त्यानंतर ते मुंबईला आले. त्यानंतर संजय राऊत यांचे हे ट्विट समोर आले. या ट्विटमधून त्यांना काय सूचित करायचे आहे याचा अद्याप उलगडा झाला नसून त्याबद्दल विविध अंदाज बांधले जात आहेत.