Home आध्यात्मिक वारकरी दिंडीचा अपघात, दोन जणांचा मृत्यू : नामदेव महाराजांच्या वंशजांच्या निधनाने आळंदीत...

वारकरी दिंडीचा अपघात, दोन जणांचा मृत्यू : नामदेव महाराजांच्या वंशजांच्या निधनाने आळंदीत हळहळ

0

संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरवरून आळंदीला जात असताना आज सकाळी दिंडीचा अपघात झाला. या घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर हडपसरमधील नोबेल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झालं सगळीकडे एकाच हळहळ माजली मीडिया रिपोर्ट नुसार अशी माहिती मिळत आहे

जमावाने दिलेल्या माहिती नुसार ही पालखी दिवेघाटात असताना एक जेसीबी एका ऑटो रिक्षला धडकून अचानक या पालखीत घुसली. या जेसीबीचे ब्रेक फेल झाले होते. घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी या दोघांच दुर्दैवी निधन झालं.  सोपान महाराज नामदास यांच्यावर आळंदी येथे सायंकाळी ६ वाजता अंत्यविधी होणार आहेत.