Home महाराष्ट्र शशिकांत शिंदेंच्या टीकेला उदयनराजेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले आमच्या नरडीचा घोट घेण्याचा केलेला...

शशिकांत शिंदेंच्या टीकेला उदयनराजेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले आमच्या नरडीचा घोट घेण्याचा केलेला तो कट….

0

केवळ १४ दिवसांवर असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्षांमध्ये बरेच तणावाचे वातावरण आहे. नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणारे उदयनराजे भोसले सुद्धा निवडणूक लढवणार आहेत. अशातच उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांच्या टीकेला उत्तर म्हणून केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उदयनराजेंनी ट्विटमध्ये शेअर केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ‘आमच्यासाठी छातीचा कोट केला होता’ असे उदयनराजेंना संबोधून वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना उदयनराजेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या वक्तव्यात ते म्हणाले की, “राजकारण-समाजकारण सोडा परंतु जेव्हा आमचा व्यक्तिगत वाढदिवसाचा सर्वपक्षीय कार्यक्रम असतांनाही ज्यांनी कट करुन, आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट, सामान्य जिल्हावासियांनी मात्र जोरदार हाणून पाडला होता. त्यामुळे तमाम जिल्हावासियांनी केलेल्या छातीच्या कोटाचे त्यांना निश्चित आश्चर्य वाटणारच.” तसेच ‘छातीचा कोट केला म्हणणाऱ्यांचा आता जनतेकडून कडेलोट होणार आहे’ असेही ते आपल्या वक्तव्यात बोलले. उदयनराजेंच्या या सडेतोड उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.