Home महाराष्ट्र राज्यात ‘या’ सेवा सुरू करणार; दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी केली ही आश्वासने

राज्यात ‘या’ सेवा सुरू करणार; दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी केली ही आश्वासने

0

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याचा मुहूर्त साधून आज बऱ्याच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली. अशात नेत्यांची आश्वासने, भाषणे, इतर पक्षांवरील टीका हे सर्व चर्चेचा विषय झाले आहेत. शिवसेनेदेखील दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमातून आजपासून प्रचाराचे रणशिंग फुंकले.

शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला लाखो शिवसैनिक उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात शस्त्रपूजा केली तसेच भाषणातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यात सर्वत्र दहा रुपयांमध्ये जेवणाची थाळी उपलब्ध करून देणार, विजेचे दर कमी करणार, गावागावात आरोग्य चाचणी केंद्रे चालू करणार अशा अनेक घोषणा त्यांनी या मेळाव्यामधे केल्या.

याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांवर तसेच त्यातील अनेक नेत्यांवर त्यांनी टीका केल्या. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आता खाऊन खाऊन थकले आहेत म्हणून त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही’ असे खोचक विधान त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केले. तसेच आमदार पदाचा राजीनामा दिल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी अश्रू ढाळले होते. यावरही उद्धव ठाकरेंनी त्यांना ‘हे मगरींचे अश्रू आहेत’ असा टोला दिला असे मीडिया न्यूज वरून समजले.