Home महाराष्ट्र मुस्लिम आरक्षणाचा कुठलाच प्रस्ताव सरकार समोर नाही: उद्धव ठाकरे

मुस्लिम आरक्षणाचा कुठलाच प्रस्ताव सरकार समोर नाही: उद्धव ठाकरे

0

मुस्लिम आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव सरकारसमोर नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यामुळे महाआघाडीत परत बिघाडीचे ढग दाटले आहेत.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना शिक्षणात आरक्षणाचा कायदा लवकरच येईल असे विधान केले होते यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की.त्यांच्याकडे या आरक्षणाविषयी कुठलाच प्रस्ताव आलेला नसून तो आल्यावर त्याची वैधता तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. विधानभवनात पत्रकारांशी बोलतांंना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी या मुद्द्यावर गळा न काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर त्यांनी त्यांच्या अयोध्या दौर्याबद्दल भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “माझी श्रध्दा आहे म्हणून मी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जातो आहे. त्यात प्रभू रामाच्या नावाने राजकारण करण्याचा प्रश्‍न येतोच कुठे? काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केल्यावर देवाचे दरवाजे बंद होत नाहीत” असे ही ते म्हणाले.