Home महाराष्ट्र CAA ला संपूर्ण पाठिंबा : उद्धव ठाकरे

CAA ला संपूर्ण पाठिंबा : उद्धव ठाकरे

0

नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी CAA ला पूर्ण पाठिंबा असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. मात्र शरद पवार आणि काँग्रेस पक्ष या कायद्याच्या तीव्र विरोधात असल्यामुळे महाआघाडी कुठले वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी CAA संबंधी बोलतांना सांगितले, “या कायद्यास घाबरण्याचे काही एक कारण नाही. मी माझी भूमिका सामना मधून स्पष्ट केली आहे. तर NRC साठी मी संसदेत स्पष्टीकरण दिले आहे आणि ते फक्त आसाम पुरतं मर्यादित आहे. NPR बद्दल बोलायचं झाल्यास तो जनगणनेचा भाग आहे आणि आवश्यक आहे.”

CAA, NRC आणि NPR या तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष यावर आता काय प्रतिक्रिया देतात हे आता महत्वाचे ठरणार आहेत.

आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत. यावेळी होणाऱ्या भाषणांमधून दोन्ही पक्षांच्या भूमिका स्पष्ट होतील असे अपेक्षित आहे.