Home महाराष्ट्र “मुस्लिमांना ५% आरक्षण देणाऱ्या उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही” : अयोध्येतील...

“मुस्लिमांना ५% आरक्षण देणाऱ्या उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही” : अयोध्येतील संत

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत्या ७ तारखेपासून अयोध्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण होत असल्या निमित्त उद्धव ठाकरे हजारो शिवसैनिकांसमवेत अयोध्येत जाणार आहेत. पण या दौऱ्यावर अडचणी येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत येण्याचे कळताच अयोध्येतील साधू संतांनी त्याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. हनुमान गढीचे संत राजू दास यांनी ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही असा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यांनी ट्विट करत त्यांचा इशारा स्पष्ट केला.

त्यांच्या मते, “शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भरकटली आहे. तिने मुसलमानांना ५% आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही.” शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अनेक वेळा गोची होत आहे, मग ते सभागृह असो वा अयोध्येतील हा विरोध. शिवसेना तिच्या मूळ मुद्द्यापासून दूर गेली असल्याचा आरोप सतत भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना करत असतात.


वाचा काय म्हणाले हनुमान गढीचे संत, 

https://twitter.com/rajudasayodhya/status/1234057363159703554?s=20